Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तध्वजारोहण समारंभादरम्यान अचानक आली भोवळ अन् थेट जमिनीवरच कोसळले..

ध्वजारोहण समारंभादरम्यान अचानक आली भोवळ अन् थेट जमिनीवरच कोसळले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेस वसलेल्या धाराशिव जिल्ह्यातून काळजाला चटका लावणारी घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक(PSI)पदी पदोन्नती मिळालेले व राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले मोहन भीमा जाधव वय ५५ वर्षे,रा.सोलापूर यांचे आज,सोमवार २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण समारंभादरम्यान अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.पदोन्नतीचा आनंद आणि नवी जबाबदारी पार पाडत असतांनाच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.सदरची घटना धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहण समारंभ सुरू असतांनाच घडली.
आज सकाळच्या सुमारास संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जात होता. अश्याच प्रकारे उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव गणवेशात सज्ज होऊन शिस्तबद्ध रांगेत उभे होते. कार्यक्रम सुरू असतांनाच जाधव यांना अचानकपणे भोवळ आली आणि ते थेट जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळताच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.बाजूलाच उपस्थित सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उमरगा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.मात्र,त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.ऐन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!