Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीधान्य खरेदी,साठवण घोटाळ्यांतील दोषींवर कारवाईचा बडगा..!- देऊळगाव आविका संस्थेस १.५३ कोटी रुपयांची...

धान्य खरेदी,साठवण घोटाळ्यांतील दोषींवर कारवाईचा बडगा..!- देऊळगाव आविका संस्थेस १.५३ कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील धान्य खरेदी तसेच साठवणूक प्रक्रियेमध्ये झालेल्या विविध अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारांवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन महिन्यांत अनेक कारवाया करण्यात आल्या असून दोषींवर निलंबन,विभागीय चौकशी, वसुली आणि गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
विभागीय चौकशी👇
अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले असून २२.४२ लाखांची वसुली सुरू आहे.या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू आहे.तसेच ट्रान्सपोर्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
चौकशी प्रस्तावित👇
 
सिरोंचा येथील २०११ सालच्या धान्य अपहारप्रकरणी २४.८ लाखांची वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल👇
आदिवासी विकास संस्था,देऊळगाव (ता.कुरखेडा) येथे २०२३-२४ मध्ये ३९०० क्विंटल तांदळाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून १.५३ कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धान्य साठ्याची शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेश👇
 
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील धान्य साठ्याची शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.२ एप्रिल रोजी झालेल्या पॅडी होर्डिंग कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
राईस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई👇
२०११ मधील धान्य लोडिंग प्रकरणात लादलेल्या २.६७ कोटी रुपयांच्या दंडापैकी १.३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.उर्वरित ७२ लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या १३ राईस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे.
धान्य खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही.दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या प्रकारांना पायबंद घातला जाईल,असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!