Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरदोन लाखासाठी अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचे अपहरण…-पैशातून पिस्तूल खरेदी करण्याचा विचार; पोलिसांनी...

दोन लाखासाठी अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचे अपहरण…-पैशातून पिस्तूल खरेदी करण्याचा विचार; पोलिसांनी केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-झटपास पैसा व पटकन श्रीमंतीच्या नादात अनेकजण शॉर्टकट मार्गाचा अवलंब करतांना दिसून येतात.आजची तरुणाई याकडे सर्वात जास्त वळलेली सर्वत्र आढळून येऊ लागली आहे.असाच प्रकार नागपुरात तीन दिवसांपूर्वी घडला.एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांकडे दोन लाख रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शॉर्टकट कमाईसाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते.या पैशांतून पिस्तूल खरेदी करण्याचादेखील त्यांचा विचार होता. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली होती.दीप आनंद गुरव वय १७ वर्षे पंचवटीनगर,असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.तो अकराव्या वर्गात शिकतो.शुक्रवारी आरोपींना भेटण्यासाठी एनआयटी गार्डन परिसरात गेला. आरोपींनी शिवीगाळ करीत त्याला बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि यशोधरानगर परिसरातील एका घरी घेऊन गेले.तेथे त्याला त्यांनी चाकूचा धाक दाखविला.दीपचा मोबाइल घरीच होता.रात्री साडेनऊ वाजता एका आरोपीने दीपच्या मोबाइलवर फोन केला व ‘तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे.मुलगा सुखरूप पाहिजे असल्यास दोन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.कोणालाही सांगितल्यास तुमच्या मुलास ठार करेल’ अशी धमकी दिली.हे ऐकून त्याची आई कविता या घाबरल्या व त्यांनी पतीला कळविले. त्यांनी थेट यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दीपचा मोबाइल तपासला असता त्यावर ९७३०३९२७९५ या क्रमांकावरून फोन आल्याचे दिसून आले.पोलिसांनी तो मोबाइल ट्रेस केला.त्याच्या लोकेशनवरून पोलिसांनी आरोपींचे स्थळ गाठले व त्यांना अटक केली.आरोपींनी पोलिस येत असल्याचे पाहताच दीपला सोडले.दीप सुखरूप होता. पोलिसांनी त्याला पालकांच्या हवाली केले.आकाश लोणारे वय २२ वर्षे रा.इंदिरामातानगर,विनीत ऊर्फ प्रणय खोब्रागडे वय २० वर्षे रा.एनआयटी गार्डन धम्मदीपनगर,गौरव मिश्रा वय २९ वर्षे रा.पिवळी नदी आणि विक्की दिघोरीकर २४, रा.वनदेवी झोपडपट्टी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.चारही आरोपी मित्र आहेत.त्यापैकी प्रणय हा शिक्षण घेत आहे.ते नेहमीच एनआयटी गार्डनमध्ये बसतात.१५ दिवसांपूर्वी सायंकाळी गार्डनमध्ये बसले असताना कमी वेळात अधिक पैसा कमविण्यासाठी त्यांनी अपहरण करण्याचा कट रचला.त्यांनी परिसरातच एक खोली भाड्याने घेतली.दीप प्रणयच्या घराजवळच राहतो व त्याच्याविषयी त्यांना कल्पना होती.आरोपींनी त्याला फोन करून त्याच्याशी अकारण वाद घालत त्याला बोलण्यासाठी बोलविले होते. अपहरणाच्या पैशांतून पिस्तूल किंवा एखादे शस्त्र विकत घेण्याचा विचार आरोपी करीत असल्याची माहिती अटकेतील एका आरोपीने पोलिसांना दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!