Saturday, July 11, 2026
Homeगडचिरोलीदोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या अन् खाली कोसळलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेला ट्रक..

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या अन् खाली कोसळलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेला ट्रक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या विचित्र अपघातात चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील हळदी येथील एका ४२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला.भारत शेंडे असे अपघात मृत पावलेल्या इसमाचे नाव असून सदरचा अपघात चामोर्शी तालुक्याच्या आष्टी-आलापल्ली मार्गावरील मार्कंडा फाट्यानजिक घडला.विशेष म्हणजे, पहिल्यांदा दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या.यात भारत शेंडे हे खाली कोसळले.तितक्यातच पाठीमागून येणारा ट्रक अंगावरून गेल्याने भारत शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.प्रकरणी शेंडे यांच्या दुचाकीला धडक देणारा दुचाकीस्वार आरोपी अक्षय तारक शहा रा. सुभाषग्राम,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली व ट्रक चालक रविशंकर बुद्धलाल नागलेकर रा.शिवनगर,कांद्री कन्हान,ता.पारशिवनी,जि.नागपूर या दोघांविरोधात मृतकाची पत्नी प्रिती भारत शेंडे वय ३४ वर्षे, रा.हळदी,ता.मूल,जि.चंद्रपूर यांनी आज,रविवार २२ मार्च रोजी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१,१२५(ब) व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पीएसआय मदन मस्के करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणारा तंबाखू माफिया तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका तंबाखू माफियाला पोलिसांनी अखेर तडीपार केले.त्याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत चार...

शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय कृषी अनुसंधान परिषद,केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूर आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्न कृषी विज्ञान केंद्र,सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!