Friday, July 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणीसाठी लागणार केवळ दोनशे रुपये..

आता शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणीसाठी लागणार केवळ दोनशे रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमिनीचे पोटहिस्से करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मोजणी फी ही तीन हजार रुपये आकारली जायची,तर त्यापुढील क्षेत्रासाठी अतिरिक्त १ हजार रुपये शुल्क घेतले जायचे.मात्र,आता महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. एकत्र कुटुंबातील जमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयांत केली जाणार आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोजणीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार असून,जमिनीचे सातबारा आणि नकाशे अद्ययावत होण्यास मोठी मदत होणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख राज्य संचालकांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून,त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा कार्यालयांना देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे,भूमी अभिलेख विभागाने केवळ शुल्कात कपात केली नसून, ही प्रक्रिया जलद करण्यासाठी कालमर्यादाही निश्चित केली आहे.जमीन पोटहिस्सा मोजणीचे अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत उपअधीक्षक,भूमी अभिलेख यांनी ही प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक आहे.संमतीने केलेले पोटहिस्से आणि दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार होणाऱ्या वाटप मोजणीसाठीही हीच सवलत लागू असेल.यामुळे मोजणीसाठी लागणारा आर्थिक भार कमी होऊन प्रकरणांची संख्या वाढण्यास मदत होईल.या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या शेतजमिनीचा मुद्रांक शुल्क विभागाचा नोंदणीकृत वाटप दस्त किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार तहसीलदारांनी दिलेला अधिकृत आदेश सादर करावा लागेल.या प्रक्रियेमुळे नकाशामध्ये जमिनीच्या हद्दी,क्षेत्र आणि चतुःसीमा यांच्या अचूक नोंदी वेळेत घेतल्या जातील, परिणामी भविष्यात होणारे हद्दींचे आणि क्षेत्राचे वाद मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी उडवला ड्रोन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेकपोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच या घटनेदरम्यान...

देसाईगंज येथे आरपीआयची बैठक संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच आंबेडकरी विचारांचा मुळ पक्ष असल्याने बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेणे गरजेचे झाले आहे....

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!