Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात राजकीय भूकंप; भाजप,राकाँ आणि शिवसेनेचे पदाधिकारी काँग्रेसच्या गोटात..

देसाईगंज शहरात राजकीय भूकंप; भाजप,राकाँ आणि शिवसेनेचे पदाधिकारी काँग्रेसच्या गोटात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज शहरात राजकीय भूकंप होतांना दिसून येत आहे.जस-जशी नगर परिषदेची निवडणूक जवळ येऊ लागली तस-तशी राजकीय वर्तुळात खलबली सुरू होऊन जणूकाही ‘एक्सचेंज ऑफर’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अश्यातच उद्या,सोमवार १० नोव्हेंबरपासून नगर परिषद निवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.तत्पूर्वी म्हणजेच आज,रविवार ९ नोव्हेंबरला काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रम्हपुरी येथील कमलाई निवास येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष,अजित पवार गटातील
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष यांनी काँग्रेसमध्ये जाहीरपणे पक्ष प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.पक्ष प्रवेशात भाजपचे माजी नगराध्यक्ष श्याम उईके,राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट)सरचिटणीस हंसराज लांडगे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास प्रधान,लुनकरण चौधरी,राधेश्याम पत्रे,अश्विन मुळे,आंबेडकरी चळवळीचे नेते साजन मेश्राम,पवन गेडाम,सहदेव पुराम यांचेसह विविध कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.या नेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका निभावली आहे.पुढील येत्या काळात अनेक कार्यकर्ते कांग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी दिली.सदरचा पक्षप्रवेश सोहळा हा आज दुपारी ब्रम्हपुरी येथील कमलाई निवास येथे उत्साहात पार पडला.यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवागतांचे स्वागत करतांना सांगितले की, “काँग्रेस ही विकास,सामाजिक समतेचा आणि जनतेच्या हिताची चळवळ आहे.आज अनुभवी आणि लोकाभिमुख नेते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत,हे या पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे द्योतक आहे.”
देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल,तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या गोटात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.आमदार रामदास मसराम यांनी या प्रसंगी बोलतांना सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांवर लढणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे देसाईगंज आणि परिसरात पक्ष आणखी मजबूत होईल.”या सोहळ्यास जिल्हा काँग्रेस पदाधिकारी,नगरसेवक,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या नेत्यांच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून,येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस विजयाची पताका फडकवेल,असा विश्वास व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!