Saturday, October 17, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेचा शुभारंभ- आत्मविश्वास व...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेचा शुभारंभ- आत्मविश्वास व नियोजनपूर्ण अभ्यास हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे रहस्य–प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- स्पर्धा परीक्षे बाबत विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर विद्यार्थी आत्मविश्वास व नियोजन पूर्ण तयारी करेल हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी बाबत विद्यार्थी चुकीचा समज बाळगलेले असतात.जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा विचार करतो अर्धे यश त्या सकारात्मक विचारातच आहे.असे मौलिक विचार प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी व्यक्त केले ते आदर्श कला,वाणिज्य महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभागाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी सुरु करण्यात आलेल्या “स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेच्या ” शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून मा. राजीव सिंग, संचालक, सिंग कोचीन क्लासेस, डॉ. जयदेव देशमुख, प्राध्यापक तथा वाणिज्य विभाग प्रमुख, प्रा. निहार बोदेले, प्रभारी, रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभाग प्रामुख्याने उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा पुढे बोलतांना म्हणाले कि, स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्वयं-क्षमतेची जाणीव होते हि जाणीव व दृष्टीकोन त्यांना केवळ स्पर्धा परीक्षेतच नव्हे तर जीवनात यशस्वी बनविते ज्याचा समाजाला सुद्धा लाभ होतो.  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. राजीव सिं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, “स्पर्धा परीक्षे बाबत ची  विद्यार्थ्यांमध्ये विनाकारणची  भीती व नकारात्मकता असते. स्पर्धा परीक्षेत अनेक घटक आपण शिकलेले असतो ते केवळ आकलन स्तरावर अभ्यास करणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तरारी करणे होय . त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनात विविधता आणावी” या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयदेव देशमुख यांनी “स्पर्धा परीक्षा हि विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याची व  समाजसेवा करण्याची संधी देते.  स्पर्धा परीक्षेची  तयारी करणारे खर्या अर्थाने गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व बनतात. अश्या विद्यार्थ्यांचा समाजावर प्रभाव असतो जे समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य करतात.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतुन रोजगार मार्गदर्शन विभागाचे प्रभारी प्रा.निहार बोदेले यांनी महाविद्यालय  विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे व त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हि योजना सुरु करण्यात आली असून या योजने अंतर्गत विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी,कोचिंग क्लासेस साठी आर्थिक सहाय्यता दिले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमोल बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.संजय परशुरामकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.हितेंद्र धोटे, डॉ.चव्हाण,प्रा.रमेश धोटे,प्रा.सुभाष मेश्राम, प्रा.जयंत रामटेके आदी प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!