Sunday, April 19, 2026
Homeनागपूरदे धक्का..! निवडणूक खर्चाचा तपशील विहीत मुदतीत सादर न केल्याने अख्खे संचालक...

दे धक्का..! निवडणूक खर्चाचा तपशील विहीत मुदतीत सादर न केल्याने अख्खे संचालक मंडळच बरखास्त.. – सहकार क्षेत्रात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ६७(१ए) अनुसार निवडणुकीत उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे खर्चाचा हिशेब सादर करावा असा नियम आहे.डब्ल्यूसीएल को-ऑप.सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २९ उमेदवारांनी खर्चाचा तपशील विहीत मुदतीत सादर केला नाही.त्यांनी केलेला कसुरीबाबत कोणतेही समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. याबाबत लेखी/तोंडी म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीसुद्धा ठेवण्यात आली.नियम क्रमांक ६५ व ६७ मधील तरतुदीनुसार खर्चाचा तपशील विहीत मुदतीत सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले.यावरून कोणत्याही संस्थेचे तथा सहकारी संस्थेचे समिती सदस्य म्हणून राहण्यास आदेशाचे दिनांकापासून तीन वर्षांकरिता अपात्र घोषित करीत असल्याचा आदेश सहकारी संस्था तालुका उमरेडचे सहाय्यक निबंधक प्रवीण निनावे यांनी नुकताच निर्गमित केला आहे.त्यानुसार उमरेड तालुक्यातील डब्ल्यूसीएल को-ऑप.सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवासह अख्खे संचालक मंडळच बरखास्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध संगीत,सचिव ज्योती भोयर,उपाध्यक्ष बिणु फिलिप्स,कोषाध्यक्ष सिंकदर कनोजे यांच्यासह निवडणुकीत उमेदवार म्हणून असलेल्या आणि निवडणूक जिंकलेल्या अशा २९ जणांवर तीन वर्षासाठी अपात्र होण्याची वेळ आली आहे.निवडणूक खर्चाचा तपशील विहीत मुदतीत सादर न केल्याने अशाप्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला.या आदेशामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असलेली उमरेड तालुक्यातील डब्ल्यूसीएल को ऑप.सोसायटी लिमिटेड ही सोसायटी वेकोलि कामगारांची आहे.सोसायटीची ही निवडणूक जबरदस्त होत असते.निवडणुकीत लाखो रुपयांची उधळण होणाऱ्या या संस्थेची मतदान प्रक्रिया १५ जानेवारी २०२३ ला पार पडली.२०२३ ते २०२८ असा नवनियुक्त संचालक मंडळाचा कालावधी होता.
डब्ल्यूसीएल को-ऑप सोसायटीची संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल १५ जानेवारी २०२३ रोजी लागला.यामध्ये अनिरुद्ध संगीत (अध्यक्ष), ज्योती भोयर (सचिव),बिणू फिलिप्स (उपाध्यक्ष), सिकंदर कनोजे(कोषाध्यक्ष) यांच्यासह दीपक मते, अमोल पजई, दिलीप पटेल,सुनील लांजेवार,उमेश फरकाडे,बुद्धरक्षित भशारकर,रसिका बोरकर या सर्व ११ संचालक मंडळाचा कालावधी संपण्यापूर्वीच त्यांना पायउतार होण्याची नामुष्की आली.यांच्यासह निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे असणारे छगन झोडे,हस्तदीप भोंगे,कुलदीप रावल,खुशाल राऊत,बंडू मंगर,मनोज बुलकुंदे,केतन मंदावार,सारिका हरडे, भावना भुसारी,सुनील श्रीखंडे,घनश्याम राहाटे,उद्य खोंडे,प्रमोद वैद्य,अनिरुद्ध चचाणे,हरीभाऊ शिंदे, प्रभाकर हलके,नरेंद्र कुहीटे,हर्षा कावडे हेसुद्धा अपात्र ठरले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!