Wednesday, October 14, 2026
Homeमुंबईदुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप हंगामात शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे आणि अंतिम भरपाईची तांत्रिक प्रक्रिया दिवाळी सणापूर्वी पूर्ण होणे अशक्य असल्याने, राज्यातील शेतकरी बांधवांना दिवाळीत तात्काळ आधार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाच हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपुर्वी पाच हजार रूपयांची अग्रीम मदत म्हणून जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना स्पष्ट केले. त्यानुसार,थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा होणार आहेत.यामुळे ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना काही प्रमाणात आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

देसाईगंजात पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्या.. -डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन नसल्याने पत्रकारांना बैठका,पत्रकार परिषदा,प्रशिक्षण कार्यक्रम,दस्तऐवजांचे जतन तसेच विविध संघटनात्मक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही समस्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!