Saturday, May 2, 2026
Homeनागपूरदीड महिन्यांपूर्वी प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचा मृत्यू..

दीड महिन्यांपूर्वी प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोराडी येथील माजी सरपंचाचा रविवारी  रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृत विठ्ठल त्यांच्यावर निमोने खापरखेडा,ता.सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर महामार्गावरील कोलार नदी घाट परिसरात असलेल्या अंडरपासमध्ये दीड महिन्यापूर्वी हल्ला करण्यात आला होता.
विठ्ठल निमोने,रा.कोराडी,ता.कामठी असे मृत माजी सरपंचाचे नाव आहे.ते २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दुचाकीने नांदा कोराडी दरम्यानच्या अंडरपासमधून जात असतांना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तिघांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला होता.या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.तेथे त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या.चार दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर काल,सोमवारी दुपारी कोराडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.हल्ला केल्यानंतर आरोपी लगेच पळून गेले होते.या घटनेबाबत विठ्ठल निमोने यांनी त्यांच्या बयाणात खापरखेडा पोलिसांना काही संशयितांची नावे सांगितली होती.पोलिसांनी राजकीय दबावामुळे ती नावे बयाणात नोंदवून घेतली नाहीत.एवढेच नव्हे तर खापरखेडा व नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेत साधी विचारपूसदेखील केली नाही.मग त्यांना अटक करणे दूरच राहिले.या संपूर्ण प्रकारामुळे खापरखेडा व नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!