Monday, July 6, 2026
Homeकुरखेडातारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

तारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवतांना विद्युतचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यात उघडकीस आली आहे.प्रभा दिनकर मडकाम वय ४५ वर्षे,रा.टेकडीटोला(गुरनोली), ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.
कुरखेडा तालुक्याच्या टेकडीटोला येथील रहिवासी
प्रभा मडकाम या नेहमीप्रमाणे काल रविवारच्या दुपारी घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवायला गेल्या.ओले कपडे तारेवर टाकणार,तोच तारेवर विद्युत प्रवाह असल्याने प्रभा यांना विजेचा जोरदार शॉक लागला.यात त्या जागीच बेशुद्ध पडल्या. सदरचा प्रकार निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ चारचाकी वाहनाने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती प्रभा यांना मृत घोषित केले. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने मडकाम कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

स्वतःच्याच घरी चालवायचे देहव्यापाराचा अड्डा; पती-पत्नीस अटक..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-स्वतःच्या राहत्या घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे.दोघेही पती-पत्नी तरुणींना पैशांचे मोठे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून देहव्यापार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!