- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा गावात एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.गाव नजीक परिसरातील तलावात तीन तरुणांचे मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदरची घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आली.दरम्यान,रात्री उशिरापर्यंत तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. तिघांच्याही अंगावर संपूर्ण कपडे असल्याने शंका-कुशंका वाढीस लागली आहे.अभिषेक आचले वय २० वर्षे, आदित्य बैस वय १६ वर्षे,तुषार राऊत वय १८ वर्षे अशी मृत तरुणांची नावे असून तिघेही देवरी तालुक्याच्या पुराडा येथील रहिवासी आहेत.तीन तरुण तलाव परिसरात पोहायला गेले असते,तर एकाने तरी अंगावरील कपडे बाजूला काढून ठेवले असते.मात्र,तिघांच्याही अंगावर संपूर्ण कपडे असल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? अद्याप स्पष्ट झाले नाही.मात्र, तिघांच्याही मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
- Advertisement -

