- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आदिवासी,अतिदुर्गम भागातील कोरची तालुक्यात एक धक्कादायक घटना आज,सोमवार २ फेब्रुवारी सर्वत्र उघडकीस आली.एका अज्ञात तरुणाचा मृतदेह जमिनीत गाळलेला दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सदरची घटना कोरची तालुक्याच्या कोटरा-बोगाटोला मार्गावरील एका तलावाजवळ उघडकीस आली.घटनेची माहिती कोरची पोलिसांना मिळताच एपीआय मुकुंद देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव पाहणी केली असता एका अज्ञात तरुणाला तलावाजवळ जमिनीत गाळल्याचे दिसून आले.मृतदेहाचा काही भाग बाहेर असल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला.मृतक तरुण हा २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून शरीरावर पॅन्ट-शर्ट तर दोन्ही हातात कडे असल्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर निदर्शनास आले.संपूर्ण शरीर काळपट पडल्याने काही दिवसांपूर्वीच त्याला जमिनीत गाळण्यात आले असावे,असा कयास बांधला जात आहे.विशेष म्हणजे,अज्ञात तरुणास जिवंत गाळण्यात आले की,मृत पावल्यानंतर? तो तलावाजवळ कसा काय आढळून आला,याबाबत कोरची पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
- Advertisement -

