Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा आयोगातील जवळपास ४७ अधिकाऱ्यांना घरी बसवले आहे.इतकेच नाही तर संसदेत पेपरफुटीवर कठोर कायदेशीर कारवाईसाठीचा कायदाही संसदेत आणण्याची तयार मोदी सरकारने केली आहे.त्यानुसार,आज सोमवार २७ जुलै रोजी संसदेत आजपासून विरोधक नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करतील.तर,सरकार आज पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा(अयोग्य साधनांना प्रतिबंध)सुधारणा विधेयक,२०२६’ सादर करेल.सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह दुपारी १२ वाजता हे विधेयक सभागृहात मांडतील. विधेयकात पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांसाठी १० वर्षांच्या तुरुंगवासाची आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.२४ जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली असून,चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.या सुधारणा विधेयकाचा उद्देश सार्वजनिक परीक्षा कायदा,२०२४ मध्ये सुधारणा करणे होय.नीट पेपरफुटीनंतर देशात प्रथमच पेटलेले विद्यार्थी आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शांत झाले आहे.तरुणाईमध्ये सरकारविरोधात किती रोष आहे,हे या आंदोलनाने दाखवून दिल्याने सरकारने तरुणाईचा धसका घेत परीक्षा सुधारणा विधेयक आणला आहे; असे म्हणने चुकीचे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!