Saturday, August 29, 2026
Homeनागपूरडॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात केला पक्ष प्रवेश

डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात केला पक्ष प्रवेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- गडचिरोली जिल्ह्याचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज दिनांक -२६ मार्च रोजी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.यामुळे काँग्रेसला विदर्भात पुन्हा धक्का बसला आहे.

नागपूर -विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे सहकारी व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर नागपुरात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.काँग्रेसमध्ये पैसेवाल्यांनाच उमेदवारी दिली जाते; असा गंभीर आरोप करीत माजी आमदार उसेंडी यांनी आज आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाने प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे.या जागेसाठी गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हेही इच्छूक होते.त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.परंतुपक्षाने डॉ.किरसान यांच्यावर विश्वास टाकला.यामुळे आपण आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्याकडे पाठविल्याचे डॉ. उसेंडी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!