Thursday, August 27, 2026
Homeनागपूरट्रकसह २१ लाखांचा तांदूळ जप्त; रेशनचा काळाबाजार - गडचिरोलीला अवैध विक्रीसाठी आणला...

ट्रकसह २१ लाखांचा तांदूळ जप्त; रेशनचा काळाबाजार – गडचिरोलीला अवैध विक्रीसाठी आणला जात होता तांदूळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- पोलीसगुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाला रेशनचा तांदूळ नागपुरात येत असून तो गडचिरोलीला जाणार असल्याची माहिती मिळाली होती.पोलिसांनी काटोल नाक्याजवळ सापळा रचला. अमरावतीचे पासिंग असलेला ट्रक येतांना दिसला. पथकाने ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता; त्यात सुमारे ११ लाख किंमतीचे ३५० क्विंटल तांदूळ होता व पोलीसांनी ट्रकसह २१  लाखांचा माल जप्त केला आहे.शेख अकील या चालकाने व अमजद खान या क्लीनरने तांदळाबाबत उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिली.अमरावती येथील रशीफ नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा तांदूळ असल्याचा दावा शेखने केला.मात्र मालकाने कुठलेही दस्तावेज आणून दिले नाही.संबंधित तांदूळ काळाबाजाराचा होता व तो गडचिरोलीला अवैध विक्रीसाठी नेण्यात येत होता.गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!