Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीजोराच्या वाऱ्याने डोंगा झाला पलटी; वैनगंगा नदीत पाच जण पडले.. - चारजण...

जोराच्या वाऱ्याने डोंगा झाला पलटी; वैनगंगा नदीत पाच जण पडले.. – चारजण बचावले; एकजण बेपत्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चामोर्शी(गडचिरोली):-डोंग्याच्या सहाय्याने नदी पार करीत असताना जोराचा वारा आल्याने डोंगा(नाव) पलटी झाला.त्यामुळे डोंग्यात बसलेली एक महिला व इतर चारजण पाण्यात पडले.चारजण कसेबसे खडकाच्या सहाय्याने बाहेर आले.मात्र,महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना चामोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील वाघोली वैनगंगा नदीघाटावर  २७ सप्टेंबरला घडली.गीता नरेंद्र चुदरी वय ३७ वर्षे रा. कोळंबी,ता.मूल असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कोळंबी या गावातील गीता नरेंद्र चुदरी ही महिला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आपल्या कुटुंबातील योगेश्वर नागमकर,नरेंद्र चुदरी,रत्नमाला नागमकर व नावाडी वासुदेव शेंडे असे पाचजण वाघोली वैनगंगा नदी घाटावरून नवेगाव येथे जाण्यासाठी नावेत बसले. नावेने नदी पार करीत असतानाच जोराच्या हवेने डोंगा पलटी झाला.त्यामुळे सदर महिला नदीमध्ये वाहून गेली.तर चारजण नदीमधील खडकाच्या साहाय्याने जीव मुठीत धरून कसेबसे बाहेर निघाले.घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरू केला.सदर शोध पथकात पोलिस निरीक्षक अमूल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, महिला पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार,पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास,बंडू कोसमशिले,पो.ह.शामल पाल,विनायक मस्कर,भावेश वरंगट्टीवार,मनोज शिद्राम,पो.ना.प्रकाश मडावी,होमगार्ड तसेच नायब तहसीलदार राजू वैद्य यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक व एनडीआरएफ टीम आणि बोट व पथकाचा समावेश आहे.
दरम्यान,शोधपथकाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविली.मात्र,महिलेचा पत्ता लागला नाही.दरम्यान, सायंकाळ होताच शोधमोहीम थांबवून पुन्हा दुसऱ्या दिवशी शनिवारी दिवसभर मोहीम राबविण्यात आली.दुसऱ्या दिवशीही मृतदेह आढळून न आल्याने काल,रविवारी २९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजतापासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!