Wednesday, October 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू...

जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात बऱ्याच दिवसांपासून उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे.सूर्यदेवता जणूकाही मनुष्य प्राणीमात्रांवर कोपला की काय? असे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.एप्रिल महिन्यामध्येच एकदम कडक उन्ह तापू लागल्याने जीव कासावीस होऊ लागला आहे.सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने प्रशासनाच्या वतीने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.अशातच ग्रामीण भागात लहान मुले-मुली उन्हा-तान्हात खेळत असतात.अश्याच प्रकारे गुरुवार २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गात शिकत असलेली चिमुकली सकाळच्या शाळेतून घरी आल्यानंतर दिवसभर उन्हामध्ये खेळत होती.उन्हामध्ये खेळत असतांना अचानकपणे तिला चक्कर आला.चक्कर येऊन ती खाली कोसळली.खाली कोसळताच जागीच गतप्राण झाली.सदरची घटना यवतमाळ जिल्ह्यातील चिखलदरा पोड येथे घडली असून सोनाश्री विठ्ठल भुरकुटे वय ७ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचे नाव आहे.घटनेच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ अंशावर गेला होता.दिवसभर कडक उन्ह तापत असतांनाच चिमुकली उन्हात खेळली,त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.उष्णतेत वाढ झाली असल्याने प्रथमतः लहान मुलांची कुटुंबीयांनी काळजी घ्यावी व स्वताच्याही शरीर सुदृढतेकडे लक्ष घालावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘त्या’ भाडेकरूचा खतरनाक कारनामा; बनावट नोटा छापून असली नोटांचे झाड उगवण्याची पाहायचा स्वप्ने.. -नोटांचे बंडल उशाखाली ठेवून करायचा मंत्रजाप..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकताच नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार २४ ऑक्टोंबर २०२६ रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता.भाड्याने म्हणजेच किरायाने राहत असलेल्या भाडेकरूच्या खोलीत...

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!