Sunday, October 25, 2026
Homeदेसाईगंजजिओची इंटरनेट सेवा ढेपाळली-नागरिक त्रस्त,जिओ सेवा सुस्त

जिओची इंटरनेट सेवा ढेपाळली-नागरिक त्रस्त,जिओ सेवा सुस्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-

ग्रामीण भागातील नागरिक खाजगी मोबाईल सेवा देणाऱ्या जिओ कंपनीच्या इंटरनेट सेवांमुळे त्रस्त झाले असून जिओ ही मोबाईल सेवा देणारी व इंटरनेट सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी आहे.या कंपनीचे राज्यात असंख्य ग्राहक वर्ग आहेत.

ग्राहक वर्ग असंख्य तर आहेत परंतु जिओच्या कासवगतीने चालणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे.सध्या ग्राहक वर्गांकडून मोठ्या रकमेचे रिचार्ज करण्यास या खाजगी कंपन्यांकडून भाग पाडले जाते.मोठी रिचार्ज करूनही सुविधा मात्र बरोबर दिली जात नसल्याचे जिओ ग्राहक वर्गांकडून बोलले जाते आहे. कित्तेक शासकीय कार्यालय,सुविधा सेतू केंद्र,सामान्य नागरिक व इतर जिओ सीम कार्डचा वापर नेहमी करतांना दिसतात.जिओ सिमची इंटरनेट सेवा ही खाजगी स्वरूपाची असल्याने ग्राहकांना सेवा मिळो अथवा न मिळो याचे या खाजगी कंपन्यांना सामान्य जनतेशी काही देणेघेणे नसते.मात्र या खाजगी कंपन्यांवर शासन स्तरावरुन काही निर्बंध लादले गेले तर अशा कंपन्यांवर सेवा देण्याबाबत आळा घालता येईल.अन्यथा खाजगी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या आपल्याच मनाचा कारभार करून ग्राहक वर्गांची लूट केल्या शिवाय राहणार नाही.

त्यामुळे जिओ सेवा देणाऱ्या खाजगी कंपनीने सुरळीतपणे ग्राहक वर्गांना इंटरनेट सेवा देण्यात यावी अशी मागणी जिओ ग्राहक वर्गांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!