- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पोलीस पथकासह केंद्रीय राखीव पोलीस दल(सीआरपीएफ)३७ बटालियनचे पथक गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना दोन संशयित व्यक्ती जंगल परिसरात फिरतांना आढळून आले.पथकाच्या जवानांनी दोघांनाही ताब्यात घेत गडचिरोली पोलीस मुख्यालयात सखोल चौकशीसाठी आणले असता सखोल चौकशी अंती दोघेही जहाल नक्षलवादी निघाल्याने आज,बुधवार ५ मार्चला विविध कलमान्वये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी फिरत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.१.केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा (पीपीसीएम,कंपनी क्र.२०),वय २६ वर्षे रा.मुरकुम,पोस्टे-तर्रेम,ता.उसूर जि.बिजापूर (छत्तीसगड) २.रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी (पार्टी सदस्य,भामरागड दलम),वय ३२ वर्षे रा.मेंढरी, ता.एटापल्ली,जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा याचेवर आजपर्यंत ५ गुन्हांमध्ये सहभाग असून ४ चकमक व १ जाळपोळ या गुन्हांचा समावेश आहे.तर रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी हिच्यावर आजपर्यंत १२ गुन्हे दाखल असून ८ चकमक व ४ खून गुन्हांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दिरंगी-फुलनार जंगल परिसरात ११ फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोघांचाही सक्रिय सहभाग होता.या चकमकीत एका सी-६० जवानाचा मृत्यू झाला होता.महाराष्ट्र शासनाने केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा याचेवर ६ लाख रुपयाचे तर रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
- Advertisement -

