Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांच्या 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास नटसम्राट पुरस्कार जाहीर. -...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास नटसम्राट पुरस्कार जाहीर. – झाडीपट्टी नाटकाचा गोंदिया येथे सन्मान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्जुनी/ लमोरगाव जि.गोंदिया या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांची उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते.राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता मराठी नाट्य वाड्.मय प्रकारात यंदा झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘जत्रा घडली नागोबाची’ या नाटकाची निवड करण्यात आली असून यंदाचे सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा व प्रसिद्ध साहित्यिक प्रा.छाया बोरकर यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.संस्थागार सामाजिक भवन,गोंदिया येथे येत्या,रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या तिसऱ्या मातोश्री साहित्य संमेलनात ‘नटसम्राट पुरस्कार-२०२६’ या नावाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.
विशेष म्हणजे,यंदा चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या नाटकास मिळालेला हा दुसरा सन्मान आहे.नुकताच संत्रानगरी नागपूर येथे साहित्य विहार संस्थेतर्फे या नाटकास सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार असून राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन १९९३ चा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
नुकत्याच सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी विदर्भातील निमंत्रित कवी म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,रमेश निखारे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ. श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),बळवंत भोयर,पांडुरंग सोनवणे यांचेसह साहित्यिक तथा कलावंतांनी शुभेच्छांचा वर्षाव करत
अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!