Sunday, August 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचक्क पोलिसांनीच पकडले पोलिसाला..!

चक्क पोलिसांनीच पकडले पोलिसाला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आपण अनेकदा चोर पोलीस खेळ खेळला असेल,काहींनी नसेलही खेळला.पण आम्ही लहानपणी ऐकले की,पोलीस हे चोरांना पकडत असतात.मात्र,एका प्रकरणात चक्क पोलिसांनीच पोलिसाला पकडण्याची वेळ आली म्हणावी लागेल. तशी घटनाही घडली आहे.मुंबईतील गोवंडी भागातील शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना मंगळवारच्या रात्री एसीबीच्या पथकाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस दलातीलच अधिकारी,कर्मचारी कार्यरत असल्याने चक्क पोलिसांनीच पकडले पोलिसाला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.सदरच्या कारवाईने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
तक्रारदार हे एका ट्रस्टचे संयुक्त सचिव असून एका कायदेशीर प्रकरणामध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.सदर कामासाठी कमीत कमी तीन लाख रुपये द्यावेच लागतील,अशी मागणी करण्यात आली.कारवाई दरम्यान तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.त्यानुसार काल मंगळवारी सापडा रचण्यात आला.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांना एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले व बाबुराव देशमुख याचेवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात तरुण आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डन समोरील चुनाभट्टी जवळच्या जंगल परिसरात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!