Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीघोटाळेबाजांची ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांना राज्य करता येणार नाही- वामन मेश्राम

घोटाळेबाजांची ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांना राज्य करता येणार नाही- वामन मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- निवडणुकीत वापरली जाणारी ईव्हीएम मशीन हि घोटाळेबाजाची घोटळे मशीन आहे. ईव्हीएम मशीनद्वारे होणारी हेराफेरी नष्ट झाली पाहीजे.’व्होट हमारा,राज तुमारा नही चलेंगा’ त्यासाठी  ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांचे राज्य येणार नाही म्हणुन संघटित शक्तीच्या बळावर सुप्रिम कोर्टच आम्हाला न्याय मिळवून देवू शकतो.यासाठी ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रवादी परिवर्तन यात्रा कन्याकुमारी ते काश्मिर पर्यत सतत सुरु राहणार आहे.आज सामाजीक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धीजीवी व राजनैनिक नेत्यांना इव्हिएम मशीनच्या गडबड घोटाळ्याची माहीती मिळत आहे.म्हणुन कांग्रेस आणि भाजपाने केलेले हे पाप मी धुवून काढून बहुजनांचे राज्य निर्माण करण्याकरीता ईव्हीएम घोटाळ्याची माहीती देत संपूर्ण देश ढवळून काढत आहे.अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन बामसेफ नेते वामन मेश्राम यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या ईव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रे प्रसंगी केले आहे.

ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन सभा इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे डॉ.शिवनाथ कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक वामन मेश्राम यांचा उपस्थितीत पार पडली.याप्रसंगी भन्ते सारीपुत , डॉ.गौतम नगराळे चंद्रपूर,ॲड.माया जमदाळे दिल्ली, भारत मुक्ती मोर्चाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख जर्नाधन तांकसाडे,रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर,विलास निंबोरकर,आनंद गावंडे,भागवत मॅडम चंद्रपूर आदींनी ईव्हिएम मशीन घोटाळाबाबत चे पितळ उघडे पाडण्या संदर्भात समायोचित भाषणे दिली. 

सभे प्रसंगी डॉ.कुंभारे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,बहुजनांच्या अनेक समस्या आहेत.त्या या माध्यमातून वामन मेश्राम यांनी सोडवून वंचित घटकांना न्याय मिळवून द्यावा व ईव्हिएम मशीन हद्दपार करणे गरजेचे आहे.असे म्हटले आहे.

कार्यक्रमाचे संचालन भोजराज कान्हेकर तर प्रास्ताविक प्रा.अशोक वंजारी यांनी केले.आभार प्रदर्शन प्रमोद राऊत यांनी मानले.भारत मुक्ती मोर्च्याच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!