- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-एका १० वर्षीय मुलीला घरात एकटी पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील भरनोली येथे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ मार्च रोजी घडली.
आरोपी कमलेश मडावी वय २६ वर्षे रा.भरनोली हा आपल्याच गावातील एका घरामध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला होता.त्या मुलीवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अत्याचार केला.दहा वर्षांच्या पीडितेने आरडाओरडा केल्याने सभोवतालची मंडळी घराच्या दिशेने धावत गेले.घडलेल्या प्रकरणाची माहिती त्यांना दिली.कृत्य करून पसार झालेल्या युवकाविरुध्द पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६५ (२),१३७ (२) बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४,६,८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.केशोरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार गणेश वणारे यांच्या मार्गदर्शनात केशोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

