Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीघरगुती भांडणावरून आईचा राग मनावर घेत २० वर्षीय तरुणीने संपविले जीवन..

घरगुती भांडणावरून आईचा राग मनावर घेत २० वर्षीय तरुणीने संपविले जीवन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील कमलापूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती भांडणावरून २० वर्षीय तरुणीने घरी ठेवलेले कीटनाशक प्राशन केल्याने तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदरची घटना काल,रविवारी ८ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली.
करुणा पोचमलू निर्ला वय २० वर्षे रा.कमलापूर असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
माहितीनुसार,घटनेच्या दिवशी करुणाचे आई- वडिलांशी कडाक्याचे भांडण झाले होते.त्यामुळे  आईने मीच विष प्राशन करून मरते,अशी धमकी मुलीला दिली.आईने बोलल्याचे शब्द मुलीच्या मनाला लागले.त्यामुळे करुणाने रागाच्या भरात घरी ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले.मुलीने विष पिल्याची बाब काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; परंतु येथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.त्यातच रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गडचिरोली येथे पाठविली होती.तेव्हा प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर यांच्याशी काही लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहन उपलब्ध करून दिले.तोपर्यंत बराच उशीर झाला होता.करुणाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!