Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीग्रामरोजगार सेवकांचे भविष्य उजळणार तरी कधी? - रोजगाराची हमी मात्र शाश्वत नोकरीची...

ग्रामरोजगार सेवकांचे भविष्य उजळणार तरी कधी? – रोजगाराची हमी मात्र शाश्वत नोकरीची हमीच नाही

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- रोजगाराची हमी असलेल्या योजनेत ग्रामरोजगार सेवकांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.रोजगार हमी योजनेची रोजगारसेवक मागील १७ वर्षाहून अधिक कालावधीपासून अंमलबजावणी करीत आहेत.परंतु मागील १७ वर्षाहून अधिक कालावधीपासून योजनेंतर्गत कार्यरत असतानादेखील रोजगाराची हमी असलेल्या योजनेत  ग्रामरोजगारसेवकांना शाश्वत नोकरीची हमी नाही.ही अत्यंत खेदजनक बाब आहे.वाढत्या महागाईच्या काळात कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे,मुलांचे शिक्षण,वयोवृद्ध आई-वडिलांचे आजारपणात औषधोपचार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे इतर राज्याप्रमाणे रोजगारसेवकांना शासकीय सेवेत कायम करावे; अशी त्यांची मागणी आहे.
ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेचे ग्रामपातळीवरील कामकाज सांभाळणे, मजुरांवर देखरेख,अहवाल देणे,दस्तावेज अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ग्रामरोजगारसेवकावर असते. मात्र,शासकीय पातळीवर त्यांची उपेक्षा केली जात आहे.कामासाठी देण्यात येणारे मानधनसुद्धा नियमित दिले जात नाही.दीर्घकाळापासून अत्यल्प व तुटपुंज्या मानधनात ग्रामरोजगारसेवक सेवा देत आहेत.
रोहयोंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरील मग्रारोहयोच्या अंमलबजावणीतील ग्रामरोजगरसेवक हा महत्त्वपूर्ण घटक आहे.नमुने जतन करणे,नोंदणीकृत मजुरांना अकुशल कामे उपलब्ध करून देणे व त्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर स्थावर मालमत्ता निर्मिती करण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांवर आहे. सोपविण्यात आलेली जबाबदारी व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून ते कर्तव्य पार पाडत आहेत. तरीही रोजगार सेवकांची दखल शासन दरबारी घेतली जात नसल्याने शासणाप्रती ग्राम रोजगार सेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!