- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गोसीखुर्द धरणामधुन वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता आज,शनिवार ५ जुलैला सकाळी ८ वाजता १७ वक्रद्वारे खुली करून
दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा विसर्ग अंदाजे २ हजार क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तसेच धापेवाडा येथील विसर्ग पाहता त्यामध्ये येत्या काही तासात गोसीखुर्द प्रकल्पाच्या विसर्ग मध्ये ४ हजार ५०० क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येणार आहे.नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.सर्व यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन सर्वांना त्वरित सुचीत करावे,असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात रेती उपसा वा इतर कामांसाठी जाण्याचे टाळावे.
- Advertisement -

