Wednesday, September 23, 2026
Homeलाखांदूरगोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळीचा वाघाने पाडला फडशा…

गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळीचा वाघाने पाडला फडशा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लाखांदूर(भंडारा) :-लाखांदूर तालुक्यातील मानेगाव  येथील घराला लागून असलेल्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या पाळीव जनावरातील एका शेळीची रात्रीच्या सुमारास वाघाने शिकार केल्याची घटना काल,३० मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकिस आली.नामदेव महादेव भंडारकर रा. मानेगाव असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे.  प्राप्त माहिती नुसार,नामदेव हा अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहे.घटनेच्या दिवशी नामदेवने नेहमी प्रमाणे जनावरे व शेळ्या दिवसभर चराई करून आणल्यानंतर घराला लागून असलेल्या गोठ्यात बांधून ठेवलेले होते.मात्र,दिनांक- ३० मे रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान नेहमी प्रमाणे नामदेव घरची जनावरे व शेळ्या सोडण्यासाठी गोठ्याकडे गेला असता त्याला वाघाने शेळीची शिकार केल्याचे दिसून आले.याची माहिती लाखांदूर येथील वनविभागाला मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी यांनी घटना स्थळावर येऊन घटनेचा पंचनामा केला.यावेळी त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत पशुपालकाने केली आहे.मानेगाव हे अगदी जंगलाला लागून असून येथे नेहमीच गावात वाघ येत असल्याचे सांगण्यात येत आहे.गावाच्या मध्यभागी पशुपालक नामदेव यांचे घर आहे.यागावाच्या मध्यभागात वाघाने येऊन शेळीची शिकार केल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!