Friday, July 24, 2026
Homeगडचिरोलीगावी जाण्यासाठी निघालेल्या इसमाचा चक्क नाल्याजवळ आढळून आला मृतदेह..

गावी जाण्यासाठी निघालेल्या इसमाचा चक्क नाल्याजवळ आढळून आला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात आज गुरुवारच्या सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली.गावी जाण्यासाठी निघालेल्या इसमाचा चक्क गावनजीकच्या परिसरातील  नाल्याजवळ मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदरची घटना भामरागड तालुक्याच्या तुमरकोठी येथे उघडकीस आली.कोमटी मासू वड्डे वय ४४ वर्षे, रा.तुमरकोठी,ता.भामरागड,जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
तुमरकोठी येथील कोमटी वड्डे हे काल बुधवारी सायकलने मरकनार येथे काही कामासाठी गेले होते. कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास मरकनार येथून आपल्या स्वगावी तुमरकोठी येथे जाण्यासाठी निघाले. मात्र,रात्र होऊनही ते घरी परतले नाही.अश्यातच आज सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना नाल्याजवळ एक सायकल दिसून आली.दरम्यान,शोध मोहीम सुरू असतांनाच नाल्याजवळ कोमटी वड्डे यांचा मृतदेह आढळून आला.प्रकरणी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्या दिशेने तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!