Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीगर्भलिंग निदानाची माहिती द्या; अन् १ लाख रुपयाचे बक्षीस जिंका..

गर्भलिंग निदानाची माहिती द्या; अन् १ लाख रुपयाचे बक्षीस जिंका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात गर्भलिंग निदानास प्रतिबंध असून कोणतीही व्यक्ती गर्भधारणेपूर्वी किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करीत असल्यास किंवा त्यास सहकार्य करीत असल्यास त्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.तसेच,माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख ही गोपनीय ठेवली जाणार आहे.
गर्भलिंग निदान करणे,गर्भपात करणे किंवा त्यासाठी मदत करणे हे सर्व गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४ व सुधारित कायदा २००३ नुसार गंभीर गुन्हे असून,दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर,तांत्रिक कर्मचारी अथवा इतर व्यक्तीला १ लाख दंड व २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती,संस्था अथवा केंद्रांची माहिती नागरिकांनी पुढे आणावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक,अधिकारी किंवा कर्मचारी कोणीही असू शकतो.
तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाइन : १८००२३३४४५४५ / १०४ आणि http://amchimulagimaha.in या संकेतस्थळावर किंवा जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे संपर्क करावा,असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!