Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन..

गडचिरोलीत जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून “मार्ग हक्काचा,सन्मानाचा” या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी वैद्यकीय महावि‌द्यालयाच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली.तर डॉ.नागदेवते  यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले.जिल्हा शल्य चिकित्सक यांनी “मार्ग हक्काचा सन्मानाचा” या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे,यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रशांत आखाडे,डॉ. दुर्वे,डॉ.साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी,महेश भांडेकर, सीएसओ डॉ.अभिषेक गव्हारे,जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय अधीसेविका,एआरटी, आयसीटीसी व विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांची उपस्थीती होती.
एडस् विरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय ते गांधी चौक, कारगिल चौक मार्गे परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे सांगता करण्यात आली. रॅली मध्ये महावि‌द्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या वि‌द्यार्थिनींनी एचआयव्ही-एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली.तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली  येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने पथनाट्य सादर करण्यात आले व बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेषक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधीसेविका रामटेके यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!