Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून प्रसारित केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.अशा पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची तसेच जिल्ह्याबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय प्रसारित अथवा फॉरवर्ड करू नये,असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
  • तेलंगणातील जुना फोटो गडचिरोलीचा असल्याचा दावा👇
सध्या सोशल मीडियावर एक छायाचित्र प्रसारित केले जात असून,त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी रुग्णाला झोळीच्या सहाय्याने दुर्गम भागातून घेऊन जातांना दिसत आहे.हे छायाचित्र गडचिरोली जिल्ह्यातील असल्याचे भासवून त्याच्या आधारे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मात्र,प्रशासनाने केलेल्या पडताळणीत सदर छायाचित्राचा गडचिरोली जिल्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.हे छायाचित्र महाराष्ट्रातील नसून तेलंगणा राज्यातील आहे.तसेच ते सध्याचे नसून सुमारे आठ वर्षांपूर्वीचे आहे.१९ जुलै २०१८ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून हे छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते.दुर्गम भागातील एका आजारी व्यक्तीला आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या अनुषंगाने संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल घेत हे छायाचित्र त्यावेळी प्रसारित करण्यात आले होते.त्यामुळे जुने आणि अन्य राज्यातील छायाचित्र गडचिरोलीतील वर्तमान परिस्थितीचे असल्याचे भासवून प्रसारित करणे हे वस्तुस्थितीशी विसंगत व दिशाभूल करणारे आहे.
  • रस्त्यांच्या दुरुस्तीपूर्वीची छायाचित्रे वर्तमानस्थिती म्हणून प्रसारित👇
जिल्ह्यातील काही रस्त्यांच्या बाबतीतही अशाच प्रकारे जुनी छायाचित्रे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती,खड्डे बुजविणे तसेच वाहतूक सुरळीत करण्याची कामे करण्यात आली आहेत अथवा सुरू आहेत. मात्र,काही ठिकाणी दुरुस्ती होण्यापूर्वी काढण्यात आलेली खराब रस्त्यांची जुनी छायाचित्रेच वर्तमान परिस्थिती दर्शविणारी असल्याप्रमाणे पुन्हा समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहेत.त्यामुळे संबंधित ठिकाणची सद्यस्थिती पडताळूनच छायाचित्रे किंवा माहिती प्रसारित करावी,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासन नागरिकांच्या समस्या,तक्रारी आणि वस्तुनिष्ठ टीकेची गांभीर्याने दखल घेत असून,प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या जात आहेत.मात्र,जुन्या अथवा अन्य ठिकाणच्या छायाचित्रांचा संदर्भ बदलून त्यांना गडचिरोलीतील वर्तमान परिस्थिती म्हणून प्रसारित केल्यास नागरिकांमध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण होऊ शकतात.
  • नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
“सोशल मीडियावर प्रसारित होणारी प्रत्येक पोस्ट, छायाचित्र किंवा व्हिडिओ वर्तमान परिस्थितीशी संबंधित आणि सत्य असेलच असे नाही.नागरिकांनी कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिचा स्रोत, दिनांक,ठिकाण आणि सत्यता पडताळून पाहावी. जुन्या अथवा अन्य राज्यांतील छायाचित्रांना गडचिरोलीशी जोडून प्रसारित केल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होतो.प्रशासनाबाबत वस्तुनिष्ठ सूचना किंवा तक्रारींचे स्वागत आहे; मात्र अप्रमाणित आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे टाळावे.नागरिकांनी अशा पोस्टपासून सावध राहून समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
नागरिकांनी संशयास्पद पोस्ट,छायाचित्र किंवा व्हिडिओ पाहिल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे प्रसारित करू नये.अधिकृत माहितीकरिता शासन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांवरून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीला प्राधान्य द्यावे,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!