उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गडचिरोली येथील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असुन या विभाग अंतर्गत दिव्यांगांच्या सोई सवलती सल्ला,मार्गदर्शन,तक्रार निवारण इत्यादी कामे केल्या जातात. या करीता दिव्यांगांना दुसऱ्या मजल्यावर चढण्या करीता शारीरिक मानसिक त्रास होत असते.त्यामुळे दिव्यांगांच्या अंतरभावना दुखावत असल्याने समाज कल्याण विभागाचे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात यावे; अशी मागणी दिव्यांग बांधवांतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ अंतर्गत प्रकरण ७ नुसार दिव्यांग व्यक्तीला अडथळा विरहित मुक्त संचार व्यवस्था करण्याचे निर्देर्शीत आहेत.त्या अंतर्गत समाज कल्याण अधिकारी यांनी कार्यवाही करण्यास पाहिजे होती.परंतु समाज कल्याण अधिकारी व या संबंधित कर्मचाऱ्यानी डोळे मिटुन मुके बहिरे होऊन दिव्यांगांचे शोषण करीत आहेत.‘समाज कल्याण अधिकारी व संबंधित कर्मचारी कायद्याचे रक्षक की कायद्याचे भक्षक’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंचायत समिती गडचिरोली येथील सभागृहात व त्यालाच लागुन असलेल्या ऑफीसमध्ये दिव्यांगाकरीता सुसज्ज अशी रॅम्प रेलींग उरड हात पकडण्यासाठी दंड लावलेली नाही.अनेकवेळा सदरची बाब दिव्यांगांनी संवर्ग विकास अधिकारी यांचे निदर्शनास आणुन दिली.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अजुन पर्यंत व्यवस्था करण्यात आली नाही.अशा प्रकारे जिल्हयातील अनेक विभागाची अशीच स्थिती आहे.तरी जिल्हयातील सर्वे करून दिव्यांगांकरीता रेलींगची व्यवस्था करण्यात यावी व गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग यांचा सदभावनेने विचार करून समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर (रोजगार ऑफिसमध्ये) विना विलंब स्थलांतरीत करून दिव्यांगांना शारीरिक व मानसिक त्रासापासुन मुक्त करावे; अशी मागणी दिव्यांग विषयक आरोग्य व शिक्षण विभागाचे माजी सदस्य मुकुंदराव उंदिरवाडे,रविंद्र रंगु,शेषराव धकाते, पि.डब्ल्यु.गेडाम यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी शेलार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदनातुन करण्यात आली आहे.

