Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली: भांडण विकोपाला गेले अन् पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन केला खून….

गडचिरोली: भांडण विकोपाला गेले अन् पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन केला खून….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेले अन् पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केला.हत्येनंतर पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या मृतदेहाशेजारी पडून राहिला.ही थरारक घटना काल, बुधवारी दिनांक -१७ जुलैच्या दुपारी अहेरी तालुक्यातील मांड्रा या गावी घडली.रत्ना सदाशिव नैताम वय ३५ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती सदाशिव लखमा नैताम वय ४५ वर्षे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सदाशिव नैताम हा नेहमी पत्नी रत्नाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा.याच कारणावरुन बुधवारी सकाळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.हे भांडण विकोपाला गेले आणि सदाशिवने रत्नाचे तोंड आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करुन तिचा खून केला.त्यानंतर तो तिच्या मृतदेहाशेजारी पडून राहिला.घटनेच्या वेळी सदाशिवचा १८ वर्षीय मुलगा चिरंजीव हा शेतावर गेला होता.चिरंजीवचा चुलत भाऊ राहुल नैताम याने शेताकडे धूम ठोकून चिरंजीवला बोलावून 

घरी येताच आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बघताच चिरंजीवने हंबरडा फोडला.नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या मदतीने आरोपी सदाशिवला बांधून ठेवण्यात आले.त्यानंतर दामरंचा येथील पोलिसांनी रत्ना सुरपाम हिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले.परंतु डॉक्टरांनी तिला घोषित केले. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!