Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली : पुरामुळे ३३ मार्ग बंद…-चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचे येलो...

गडचिरोली : पुरामुळे ३३ मार्ग बंद…-चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचे येलो अलर्ट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- तीन दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे.पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने नदी,नाले भरभरून वाहू लागले आहेत.अनेक गावांतील संपर्क तुटल्या गेले आहे.अशातच आता आजपासून पाच दिवस गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचे येलो अलर्ट दिले आहे.येलो अलर्ट नुसार एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस,विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची संभावना दिनांक – आज,२२ जुलै ते २६ जुलै पर्यंत हवामानविभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ३३ मार्ग बंद झाली आहेत.त्यामध्ये

१) आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला,)ता.भामरागड 

२) अहेरी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला ता. अहेरी

३) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलाकर्जी ते रेपनपल्ली भाग) छल्लेवाडा ते कमलापुर मार्गाने पर्यायी वाहतूक सुरू ता. अहेरी

४)  जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा

५) पोर्ला वडधा रस्ता ता.कुरखेडा

६) वैरागड कुरखेडा रस्ता ता.कुरखेडा

७) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला ता. चोमोर्शी 

८) भेंडाळा अनखोडा रस्ता ता.चामोर्शी 

९) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता.चामोर्शी 

१०) चांदेश्र्वर टोला रस्ता ता. चामोर्शी 

११) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता.चामोर्शी 

१२) आंधळी कुरखेडा रस्ता ता.कुरखेडा 

१३)  रामगड उरांडी रस्ता ता.कुरखेडा 

१४) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी 

१५) कोनसरी जामगड रस्ता ता.चामोर्शी

१६) चामोर्शी फराळा मार्कडादेव ता.चोमोर्शी 

१७) गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ता. गडचिरोली 

१८) आलापल्ली आष्टी ता.अहेरी 

१९) कंबालपेठा पुसुकपल्ली ता.सीरोंचा

२०) तळेगाव चारभट्टी ता. कुरखेडा

२१) काढोली ते सावलखेडा ता.कुरखेडा

२२) मुत्तापुर माल रस्ता ता.सिरोंचा

२३) कुरखेडा वैरागड रस्ता ता. कुरखेडा

२४) वैरागड देलनवाडी रस्ता ता.आरमोरी 

२५) ठाणेगाव वैरागड रांगी रस्ता ता.आरमोरी 

२६) आरमोरी अंतरंगी जोगिसाखरा रस्ता ता. आरमोरी 

२७) मानापुर नंदा कलकुली रस्ता ता. आरमोरी 

२८) बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता ता. सिरोंचा 

२९) कोरची बोटेकसा रस्ता ता. कोरची 

३०) मौसिखांब वडधा रस्ता ता. वडसा 

३१)सोमनपल्ली जाफराबाद रस्ता सोमनुर नाला ता. सिरोंचा

३२) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ता. गडचिरोली 

३३) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता ता.सिरोंचा

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!