Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी 'स्टील हब' ची घोषणा.....

गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी ‘स्टील हब’ ची घोषणा.. – ७० हजार ८९५ युवकांना थेट रोजगार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,शुक्रवारी मांडलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक तरतुदी केल्या आहेत.जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी ‘स्टील हब’ची घोषणा करण्यात आली असून,कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विमानतळ आणि समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.
  • गडचिरोली बनणार ‘ग्लोबल स्टील हब’👇
जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा विनियोग करून रोजगार निर्मितीसाठी सरकारने मोठी गुंतवणूक आकर्षित केली आहे.
गुंतवणूक: तब्बल २.६१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित.
रोजगार: या प्रकल्पातून ७० हजार ८९५ युवकांना थेट रोजगार मिळणार.
पर्यावरण: उद्योगासोबतच जैवविविधता जपण्यासाठी ५ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट.
  •  कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी झेप: विमानतळ आणि समृद्धी महामार्ग-
  • गडचिरोलीचा दुर्गम हा शिक्का पुसण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
विमानतळ: गडचिरोली येथे नवीन विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा थेट हवाई नकाशावर येणार आहे.
समृद्धी महामार्ग विस्तार: नागपूर ते चंद्रपूर आणि भंडारा ते गडचिरोली अशा समृद्धी महामार्गाच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.यामुळे दळणवळण वेगवान होऊन उद्योगांना चालना मिळेल.
  •  ‘बिरसा'(BIRSA)योजनेतून आदिवासी युवांना बळ-
आदिवासी बहुल असलेल्या या जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी ‘भारत इनोव्हेशन,रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता’(BIRSA-बिरसा) ही विशेष योजना राबविली जाणार आहे.यातून नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल.
  • आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत विशेष स्थान👇
गडचिरोली जिल्ह्याचा ‘आकांक्षित जिल्हा’ (Aspirational District)कार्यक्रमांतर्गत विकास अधिक गतिमान केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या विस्तारातून जिल्ह्यासाठी विशेष निधी आणि यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल.
  • आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा👇
राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था: मिहान,नागपूर येथे स्थापन होणाऱ्या या संस्थेचा फायदा गडचिरोलीसारख्या पूरप्रवण आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका असलेल्या जिल्ह्याला संशोधनासाठी होईल.
सायबर सुरक्षा: नागपूर येथे होणाऱ्या ‘स्टेट डेटा सेंटर’चा लाभ संपूर्ण विदर्भातील प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी होणार आहे.
  •  थोडक्यात महत्त्वाचे👇
शेती: २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत गडचिरोलीतील शेतकऱ्यांना प्राधान्य.
आरोग्य: नागपूर येथील ‘महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था’ आणि ‘प्रगती’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गंभीर आजारांच्या निदानासाठी ४ हजार ५०० कोटींची तरतूद.
शिक्षण: ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ योजनेत गडचिरोलीतील ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग असणार.
  • इतर महत्त्वाचे रस्ते प्रकल्प👇
राज्यातील १ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्यासाठी आशियाई बँकेच्या सहाय्याने ४ हजार ५०० कोटींचा प्रकल्प राबविणार.
कल्याण-लातूर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग प्रस्तावित.
नागपूर-गोंदिया,भंडारा-गडचिरोली,नागपूर-चंद्रपूर अशा प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गांना मान्यता.
वाढवण बंदर व समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी तवा- भरवीर माल वाहतूक कॉरिडोर प्रकल्पास मान्यता.
चाकण-शिक्रापूर(२८ किमी)सहापदरीकरण- ₹५,२३२ कोटी.
शिरूर(पुणे)-छत्रपती संभाजीनगर १९२ किमी ग्रीनफील्ड महामार्ग-₹ १४,८८६ कोटी.
हडपसर-यवत ३१.५० किमी सहापदरी रस्ता- ₹५,२६२ कोटी.
  • विमानतळ विकास👇
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरु.
पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरण.
गडचिरोली ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु.
लातूर,बारामती,अमरावती या विमानतळांवर रात्रीच्या उड्डाणासाठी सुविधा उपलब्ध करणार.
शिर्डी,नाशिक,छत्रपती संभाजीनगर,अमरावती, अकोला,रत्नागिरी,यवतमाळ व कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरु.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!