Wednesday, June 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील आजचे पूरस्थिती अहवाल- जिल्ह्यात आजही पर्जन्यमानाचा येलो अलर्ट....

गडचिरोली जिल्ह्यातील आजचे पूरस्थिती अहवाल- जिल्ह्यात आजही पर्जन्यमानाचा येलो अलर्ट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील आज २३ जुलै २०२३ रोजीचे पूरस्थिती अहवाल खालीलप्रमाणे 👇

1.वैनगंगा नदी : गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 15 गेट 0.50 मी.ने उघडलेले असुन 1,796 क्युमेक्स (63,414 क्युसेक्स) विसर्ग आहे.चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 5,426 क्युमेक्स (1,91,601 क्युसेक्स) आहे. 

वडसा,वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

2. वर्धा नदी : निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 25 गेट उघडलेले असुन विसर्ग 671 क्युमेक्स (23,696 क्युसेक्स) आहे. बामणी (बल्हारशा) या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे.सिरपूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी  इशारा पातळीच्या वर असुन धोका पातळीच्या 0.23 मी.ने खाली आहे.

3. प्राणहिता नदी : दिना प्रकल्प 100 टक्के भरलेला असून सांडव्यावरुन विसर्ग निरंक आहे.

महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

4. गोदावरी नदी : श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 7 गेट उघडलेले असुन विसर्ग 979 क्युमेक्स (34,566 क्युसेक्स) आहे.लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 75 गेट उघडलेले असुन विसर्ग 17,044 क्युमेक्स (6,01,910 क्युसेक्स) आहे.बॅरेज ची पाणी पातळी 95.80 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 4.20 मी. ने खाली आहे.कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

5. इंद्रावती नदी : जगदलपूर, चिंदनार, तुमनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *पुलाच्या पातळीच्या खाली आहे.

इशारा : नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक तसेच वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे.नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी,तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.

हवामान संदेश : भारतीय हवामान विभागाचे नागपूर, हैद्राबाद, रायपूर व भोपाल केंद्र यांचे दिनांक 22.07.2023 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी उपखोऱ्यातील काही भागात आजही मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यात आजही पर्जन्यमानाचा येलो अलर्ट दिलेला असल्याने नागरिकांनी उचित दक्षता घ्यावी; असे आवाहन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!