Friday, May 1, 2026
Homeगोंदियाहत्तीचा कळप गोंदिया-गडचिरोली सीमेवर- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे केले नुकसान

हत्तीचा कळप गोंदिया-गडचिरोली सीमेवर- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे केले नुकसान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- हत्तीचा कळप गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असून शुक्रवारी (दि.२१) या कळपाने राजोली,भरनोली शिवरामटोला,बल्लीटोला परिसरातील शेतात धानरोवणीचे नुकसान केले.कळपातील एक टस्कर हत्ती भरकटला असून तो देवरी तालुक्यातील ग्राम जेठभावडा येथे दिसल्याचे कळते.

गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीचा कळप अर्जुनी-मोरगा तालुक्यात गेला असून बऱ्याच दिवसाच्या मुक्कामानंतर तो परतीच्या मार्गाला लागला आहे. तालुक्याच्या मुक्कामात कळपाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले आहे.हतीच्या कळपाचे अर्जुनी-मोरगाव तालुका टार्गेट असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही; सदर कळप इटियाडोह धरण नजीकच्या झाशीनगर उपसा सिंचन योजने शेजारच्या पहाडावर होता.चार ते पाच दिवसांपासून या कळपाचा राजोली, भरनोली, शिवरामटोला,बल्लीटोला परिसरात शेतशिवारात धुमाकूळ सुरू होता.शुक्रवारी (दि.२१) रात्री या कळपाने सुमारे १८ शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान केल्याची माहिती आहे.

शनिवारी (दि.२२) हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सिंदेसुर,बाम्हणी या परिसरात दाखल झाल्याचे समजते.गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने तो माघारी परततो की गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने आगेकूच करतो हे सांगता येत नाही.या कळपाचे जंगल मार्गाने मार्गक्रमण राहिल्यास शेतशिवाराचे कमी प्रमाणात नुकसान होईल.मात्र शेतमार्गाने मार्गक्रमण राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

खालील शेतकऱ्यांचे केले नुकसान 👇

गुरुवार व शुक्रवारी हत्तीच्या कळपाने राजोली व परिसरातील धान रोवणी तुडवली.दोन दिवसात सुमारे ३१ शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी बुधवारी उमरपायली परिसरात नुकसान केले आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांत आनंदराव जांभूळकर, गोपाल शेंडे,आडकू नाईक,पंढरी बुद्धे,दिलीप बुद्धे, वासुदेव मस्के,फागु कोल्हे,दुधराम मस्के,रामदास मस्के,सुनीता लांजेवार,रामलाल लांजेवार,जगन लांजेवार,नामदेव लांजेवार तसेच भरनोली,बोरटोला येथील गणपत चौधरी,रमेश चौधरी,बकाराम नेताम, सदाराम नैताम,जयवंता मडावी,रघुनाथ कोवाची, मोहनलाल कुंभरे,धनिराम कुंभरे,मेनका कुंभरे,केशव कन्हाडे,रवींद्र कन्हाडे,विश्वनाथ सलामे,सुनीता सलामे, रयनलाल हारामी,दुधराम हारामी,देवराम हारामी व चुन्नीलाल हारामी इत्यादींचा समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!