- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-हवामान खात्याने आज,बुधवार ९ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यातील पुढील येत्या तीन तासांत काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचे पाऊस तथा वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगून उचित काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज,बुधवार दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले असतांनाच काही वेळापूर्वी नागपूर हवामान विभागाने पुढील येत्या तीन तासांत हवामानात बदलाचे संकेत वर्तविले आहे.अशातच एखादी अनुचित घटना घडू नये,याकरीता आकाशात विजेचा कडकडाट/गडगडाट असतांना धातुजन्य वस्तू जवळ बाळगू नका,धातुजन्य खांब,वीज सुवाहक वस्तू जवळ राहू नका,विशेषतः उंच झाडापासून दूर रहावे तसेच उंच ठिकाणी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

