Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.उद्या,मंगळवार २६ ते २७ मे २०२६ दरम्यान जिल्ह्यात काही भागांत उष्ण लहरसोबतच उष्ण रात्रींचीही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होत असल्याने मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास उष्माघाताचा धोका निर्माण होऊन गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याचीही शक्यता असल्याने नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे ओळखून योग्य वेळी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला असून तहान लागली नसली तरी नियमित अंतराने पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री,टोपी किंवा ओल्या कपड्याचा वापर करावा.दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.हलकी,सैल व सुताची कपडे वापरावीत तसेच प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे,असेही सांगण्यात आले आहे.
उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी किंवा नागरिकांनी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी,शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस(ORS),लिंबूपाणी,ताक, लस्सी,कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. अशक्तपणा,चक्कर येणे,डोकेदुखी,जास्त घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
गरोदर महिला,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.पाळीव प्राणी व गुरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे.घर थंड राहण्यासाठी पडदे,शटर,सनशेड यांचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात,असेही प्रशासनाने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांनी दारू,चहा,कॉफी व कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे.जड व गडद रंगाचे कपडे वापरू नयेत.अतिश्रमाची कामे शक्यतो टाळावीत तसेच लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये,असेही सूचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि उष्मालाटेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!