उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत गडचिरोली-चिमुर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज,दिनांक-३० मार्च रोजी करण्यात आले आहे.याबाबत आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.
खालील उमेदवार असणार रिंगणात 👇
नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव,पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहेत.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ),डॉ.नामदेव दसाराम किरसान,इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),योगेश नामदेवराव गोन्नाडे,बहुजन समाज पार्टी (हत्ती).नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे,जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा),हितेश पांडूरंग मडावी,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).इतर उमेदवार : करण सुरेश सयाम,अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी,अपक्ष (अंगठी) इत्यादी असणार आहेत.

