Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियाक्षुल्लक कारणावरून झाले कडाक्याचे भांडण अन् मित्रानेच केला मित्राचा खून…

क्षुल्लक कारणावरून झाले कडाक्याचे भांडण अन् मित्रानेच केला मित्राचा खून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना काल,गुरूवारी दिनांक- २३ मे रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील छोटा गोंदिया / गोविंदपूर परिसरातील जितेश चौकात घडली.राहुल दिलीप बिसेन वय २२ वर्षे,रा.शास्त्री वार्ड,गोंदिया असे मृत युवकाचे तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर वय २३ वर्षे,रा.जितेश चौक,गोंदिया असे आरोपी मित्राचे नाव आहे.दरम्यान,पोलिसांनी गुन्हा नोंद करून काही तासातच आरोपीला अटक केली आहे.

मृत राहुल व सोनू हे दोघेही मित्र होते.दरम्यान, घटनेच्यावेळी जितेश चौक परिसरात दोघांमध्ये काही क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले.यात सोनूचा राग अनावर झाल्याने त्याने धारदार चाकूने राहुलच्या पोटावर व छातीवर वार करुन त्याचा खून केला व घटनास्थळावरुन पसार झाला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर,शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणी फिर्यादी दिलीप जीवनलाल बिसेन (वय ४५ रा.शास्त्री वार्ड यांनी तक्रार दिली होती.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वात आरोपीच्या शोधाकरीता विविध पथके नेमण्यात आली होती.दरम्यान,गोंदिया शहर पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकांनी संयुक्तपणे कारवाई करीत संशयित आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर याला अटक केली.गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखडे यांनी केला असून गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिनी बनकर करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!