Tuesday, October 27, 2026
Homeनागपूरक्यूआर कोड स्कॅन करा आणि मुख्यमंत्र्यांपासून मंत्री,आमदार,पोलीस व सर्वांचे नंबर मिळवा.. विधिमंडळ...

क्यूआर कोड स्कॅन करा आणि मुख्यमंत्र्यांपासून मंत्री,आमदार,पोलीस व सर्वांचे नंबर मिळवा.. विधिमंडळ हिवाळी अधिवेशन-२०२५ ‘दूरध्वनी पुस्तिका’ प्रकाशित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन आज, सोमवार ८ डिसेंबर रोजी माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.नागपूर येथे अधिवेशनाकरिता येणाऱ्या राजकीय प्रतिनिधी, अधिकारी,पत्रकार व नागरिकांना संबंधित शासकीय यंत्रणेशी सुलभ आणि त्वरित संपर्क साधता यावा,या उद्देशाने ही विस्तृत मार्गदर्शिका तयार करण्यात आली असून संबंधितांना ही उपयुक्त ठरेल,असे ब्रिजेश सिंह यांनी याप्रसंगी सांगितले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते या दूरध्वनी पुस्तिकेच्या क्यू आर कोड चेही प्रकाशन करण्यात आले.या क्यू आर कोडमुळे संपूर्ण दूरध्वनी पुस्तिका आता डिजिटल स्वरूपात सहजपणे ऑनलाईन उपलब्ध झाली आहे,ज्यामुळे पुस्तिका छपाईसाठी लागणाऱ्या शासनाच्या निधीतही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
पुस्तिकेतील संपर्क माहितीचा तपशील👇
अधिवेशनाच्या काळात सुलभ समन्वयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ही दूरध्वनी पुस्तिका दोन भागांत विभागली आहे:
भाग-१(राजकीय व व्यवस्थेशी संबंधित): यात प्रामुख्याने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्रिमंडळाचे सदस्य,विधानमंडळाचे प्रमुख(अध्यक्ष,सभापती)यांची कार्यालये व निवासस्थाने यांचे संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत.तसेच,विधान भवन,हैदराबाद हाऊस,रवी भवन आणि नाग भवन येथील तात्पुरत्या निवास व कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.यासह,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क आणि नागपूर शहर परिसरातील वैद्यकीय सुविधा,पर्यटन स्थळे व परिवहन(रेल्वे, विमान वाहतूक)संबंधी माहितीही उपलब्ध आहे.
भाग-२(शासकीय कार्यालये): यात नागपूरमधील विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पोलीस विभाग, न्याय व्यवस्था आणि विविध प्रशासकीय विभाग (सार्वजनिक बांधकाम,वित्त,जलसंपदा)व स्थानिक स्वराज्य संस्था(मनपा/एनआयटी)यांची कार्यालये व अधिकाऱ्यांचे विस्तृत संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत.
पुस्तिका प्रकाशन सोहळ्याला सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपसचिव अजय भोसले,कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर,माहिती विभागाचे संचालक(प्रशासन)किशोर गांगुर्डे,नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ.गणेश मुळे व संचालक(वृत्त) गोविंद अहंकारी,महासंचालक यांचे विशेष कार्य अधिकारी इरशाद बागवान व जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे उपस्थित होते.
या दूरध्वनी पुस्तिका निर्मितीसाठी गडचिरोलीचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, नागपूर माहिती विभागातील सहाय्यक संचालक पल्लवी धारव,माहिती अधिकारी रितेश भुयार,माहिती अधिकारी अतुल पांडे तसेच माध्यम समन्वयक अनिल गडेकर आणि शासकीय मुद्रणालयाचे सहकार्य लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!