Sunday, July 12, 2026
Homeनागपूरकोट्यवधी रुपयांचा कर वसुली घोटाळा; विस्तार अधिकारी व चार ग्रामसेवक निलंबित... -...

कोट्यवधी रुपयांचा कर वसुली घोटाळा; विस्तार अधिकारी व चार ग्रामसेवक निलंबित… – दोषींकडून घोटाळ्याची रक्कम होणार वसूल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर ग्रामीणच्या बोखारा ग्रामपंचायत मधील कोट्यवधींच्या कर वसुली घोटाळा प्रकरणात विस्तार अधिकारी व चार ग्रामसेवक असे एकूण पाच जण निलंबित करण्यात आले आहे.चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. यात सेवानिवृत्तांचाही समावेश असल्याने त्यांची विभागीय चौकशी होणार आहे.दोषींकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बोखारा ग्रामपंचायतीत कर वसुलीत घोटाळा झाल्याचा मुद्दा सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता.त्यावर बैठकीत चौकशीचे आदेश देण्यात आले होते.त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या घोटाळ्याची तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.त्यावर बावनकुळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी अतिरिक्त सीईओ कमलकिशोर फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. चौकशी समितीने आपल्या अहवालात बोगस पावत्यांवर कर वसुली केल्याचा ठपका ठेवला होता. या प्रकरणात विस्तार अधिकारी व चार ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
२०२०-२२ सालापासून बोखारा ग्रामपंचायतीत कर घोटाळा सुरू होता.यादरम्यान सहा ते सात ग्रामसेवक वेगवेगळ्या कालावधीत कार्यरत होते.यातील काही सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्यावरही या प्रकरणात कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!