- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज) :-शासनाच्या वतीने दिनांक- १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” अभियानासोबतच ग्रामपंचायत,शाळा,शासकीय कार्यालये व शासनाच्या अखत्यारीतील इतर ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे स्पष्ट असे निर्देश आहेत.त्यानुसार आज,दिनांक-१३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान कोंढाळा येथील ग्रामपंचायत आवारात तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी,
आशा वर्कर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा बहुमान ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन सेलोटे यांना मिळाला तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा बहुमान शाळेचे शिक्षक लालचंद धाबेकर यांना मिळाला आहे.राष्ट्रीय ध्वज फडकवील्यानंतर मानवंदना,राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गाऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात
ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला.ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
ध्वजारोहण सोहळा आणखी दोन दिवस होणार असून गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वजारोहण सोहळा प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,ग्रामसेविका मेघना राऊत,पोलीस पाटील किरण कुंभलवार,माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली रोषनिताई पारधी,माजी पं.समिती उपसभापती नितीन राऊत,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे,सदस्या भुमेश्र्वरी गुरनुले,नलिना वालदे,कल्पना झीलपे,गोकुल ठाकरे,प्रफुल मेश्राम,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,उपाध्यक्ष भास्कर पत्रे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पारधी,उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे, लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख, माजी सरपंचा मंगला शेंडे,अनिता चौधरी,वैष्णवी वांढरे,नागोराव उके,निखिल गोरे,भूषण देशमुख कृषी पर्यवेक्षक,राहुल तुळसकर कृषी सहाय्यक,नामदेव पारधी,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तुपट,अजय भर्रे,शालेय विद्यार्थी,प्रतिष्ठित नागरिक व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

