Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीकेंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.इच्छुक पालकांनी १७ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विद्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.
विद्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रवेश सूचनेनुसार प्रवेश नोंदणीची प्रक्रिया येत्या,शुक्रवार १७ जुलै २०२६  रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ अशी असून सोमवार ते शनिवार या कालावधीत विद्यालयाच्या कार्यालयात अर्ज जमा करता येणार आहेत.
प्रवेश अर्ज विद्यालयाच्या कार्यालयातून विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील.पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत विद्यालयात जमा करणे बंधनकारक असून,संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ मार्च २०२६ रोजीच्या वयानुसार निश्चित करण्यात आली आहे.त्यानुसार, इयत्ता १ लीसाठी ६ ते ८ वर्षे,इयत्ता २ रीसाठी ७ ते ९ वर्षे,इयत्ता ३ रीसासाठी ८ ते १० वर्षे,इयत्ता ४ थीसाठी ९ ते ११ वर्षे आणि इयत्ता ५ वीसाठी १० ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहतील.
विद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले की,प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेच्या(KVS)प्रवेश मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येणार आहे.यामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE),अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,इतर मागासवर्गीय(ओबीसी-एनसीएल),दिव्यांग तसेच एकुलती एक मुलगी (Single Girl Child)या प्रवर्गांसाठी लागू असलेले आरक्षण व इतर नियमांचा अवलंब करण्यात येईल.
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता,कागदपत्रे,रिक्त जागा, प्रवेशासंबंधी सविस्तर मार्गदर्शक सूचना तसेच इतर माहिती
https://drive.google.com/drive/folders/1kNCL0ce9NyiIA3mbxfrYnAgiJ98OXTPH?usp=drive_link या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच ही माहिती विद्यालयाच्या सूचना फलकावरही पाहता येईल.
अर्जामध्ये चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास प्रवेश प्रक्रियेदरम्यान किंवा प्रवेशानंतरही संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल,असा इशारा विद्यालय प्रशासनाने दिला आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांनी केंद्रीय विद्यालय,सेमना बायपास,आनंदनगर,गडचिरोली – ४४२६०५ येथे संपर्क साधावा किंवा ०७१३२-२२३०२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!