- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-एका शेतकऱ्यास कृषीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने दोन हजाराची लाच मागून एका खासगी व्यक्तीकडे देण्यास सांगितले असता खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथील शिवाजी चौकाच्या प्रवासी निवारा समोर गुरुवारी रंगेहाथ पकडले.प्रकरणी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ रणदीप काशीराम गोखे वय ४० वर्षे,इळदा-केशोरी व खासगी व्यक्ती मृणाल संजय ब्राम्हणकर वय ४० वर्षे,रा.सिंगलटोली,अर्जुनी- मोरगाव असे लाचखोर आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार,३२ वर्षीय तक्रारदार हे शेतकरी आहेत.
तुकम-सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने शेतात
मोटारपंप चालविण्यासाठी मीटर लावले आहे.सोमवारी १७ फेब्रुवारीला आरोपी रणदीप गोखे याने मीटर खराब झाल्याचे सांगून जोडणी कापली. यावर तक्रारदाराने नवीन मीटरची मागणी केली असता गोखे याने तक्रारदारास तुला थेट वीज जोडणी देतो.तसेच थेट जोडणी करून वीज वापरल्यामुळे वीज चोरीची कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली.यावर तक्रारदाराने गुरुवारी २० फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता गोखे याने पंचांसमक्ष लाचेची मागणी केली.तर त्याच्या सांगण्यावरून मृणाल याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम स्वीकारली.पथकाने लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेतले असून केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले,सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,हवालदार संजय बोहरे,मंगेश काहालकर,नायक शिपाई संतोष शेंडे,अशोक कापसे,प्रशांत सोनेवाने, महिला शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली.
- Advertisement -

