- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या मोठ्या हुद्यावर विराजमान झाल्यानंतर बोलतांना सांभाळूनच बोलावे लागत असते.अन्यथा अर्थाचे अनर्थ होऊन अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.अश्याच प्रकारे राज्याचे
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार,असे वक्तव्य केव्हा ना केव्हा तरी करीत असतात.यापूर्वी कर्जमाफीच्या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.अशातच नुकतेच शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.हे वक्तव्य ताजे असतांनाच माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.स्वतःच्याच मंत्रिपदाबाबत त्यांनी हे विधान केले आहे. ‘कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’, असे ते म्हणाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत.कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभजी नगर शहरात प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यामध्ये बोलतांना माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच्या मंत्रिपदाबाबत वादग्रस्त विधान केल्याने वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
- Advertisement -

