- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहराच्या सती नदी पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने कोरची, मालेवाडा,पुराडा,कढोली,घाटी व इतर परिसरातील वाहनधारक पर्यायी मार्ग असलेल्या आंधळी (नवरगाव)-वाघेडा-मालदुगी मार्गाचा आवागमन करण्यास जास्तीत-जास्त वापर करीत आहेत. परिणामी,सदर मार्गाची दुरावस्था झाल्याने ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ असे होऊनही संबंधित विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करून निद्रावस्थेत गेले की काय? असा प्रश्न मार्गावरून आवागमन करणारे वाहनधारक तथा नागरिकांना पडू लागला आहे.अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांनी आज,११ सप्टेंबर रोजी सदर मार्गावरून प्रवास करीत असतांना रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून सरकारचा तसेच लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध नोंदवला.

आंधळी(नवरगाव)-वाघेडा डांबरीकरण मार्ग पूर्णपणे उखडून गेल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.खड्ड्यांमुळे वाहनधारकांना सदर मार्गावरून ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.खड्डे चुकवतांना अनेकदा अपघात झाल्याच्या घटना सदर मार्गावरून घडू लागल्या आहेत.पावसाच्या दिवसात पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहिल्याने ‘रस्ता की खड्डा’ अशी अवस्था मार्गाची झाल्याने आदळून-आपटून अनेकांचे कंबरडे मोडू लागलेत. अशातही ‘जागल्या’ जागे होण्याचे नावच घेत नसल्याने संबंधित विभाग अनेकांच्या जीवावर उठला असल्याचे दिसून येत आहे.नागरिकांच्या मते,एकदा तरी आंधळी(नवरगाव)-वाघेडा-मालदुगी मार्गावरून एखाद्या मंत्र्यांचे वाहन जावे; तेव्हा कळेल की,सदरचा मार्ग किती आनंददायी व सुकर आहे.सदरचा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाल्याने; याकडे संबंधित विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष न करता; तात्काळ आंधळी(नवरगाव)-वाघेडा मार्गाचे डांबरीकरण करावे; अशी मागणी काँग्रेस नेते रामदास मसराम यांचेसह मित्र परिवार,वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम,कुरखेडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,आंधळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अप्रव भैसारे,आंधळी ग्रामपंचायतीच्या सदस्या पल्लवीताई कुसाम,दुधराम लाकडे,सुनील भोंडे, विलास बंसोड, राजकुमार बावनथडे,दिवाकर दरवडे,लीलाराम देवारे, उस्मान पठाण,सागर वाढई,रेशीम प्रधान,लंकेश ढोरे, जितेंद्र चौधरी व आंधळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -

