Monday, July 13, 2026
Homeनागपूरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश.. -गडचिरोली,भामरागड,सिरोंचा...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश.. -गडचिरोली,भामरागड,सिरोंचा येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू सज्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विभागात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.गत दोन दिवस पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीकरुन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.प्रसंगी विभागीय आयुक्तांकडून त्यांनी आढावा घेतला.
गडचिरोली,गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात बाघ, वैनगंगा,बावनथडी नद्यांना पूर आला.गोंदिया जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला.या तीन जिल्ह्यातील १०२२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलविले आहे.पावसाच्या पाण्यामुळे एकूण ४७ मार्गांवर गतिरोध उत्पन्न झाले असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.यातील सर्वाधिक ३५ ठिकाणे एकट्या गोंदिया जिल्ह्यात आहेत.सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे हळहळू पाणी ओसरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यावर मात करण्यासाठी एसडीआरएफच्या २ तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन चमूंच्या ३ तुकड्या कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.गडचिरोली,भामरागड,सिरोंचा येथेही आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू सज्ज आहेत.प्रशासनाला दक्षतेचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!